भुसावळ । तालुक्यातील वांजोळा येथील ग्रामसेवक दीपक तारडे यांची दीड वर्षांपासून बदली झाल्यानंतरही त्यांनी पदभार न सोडल्याने या संदर्भात लोकप्रतिनिधींनी जिल्हा परीषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्यासह गटविकास अधिकार्यांनी शुक्रवारी वांजोळा गाठत मोहन पाटील यांना पदभार दिला. याप्रसंगी कपाटाचे कुलूप तोडून कागदपत्रांचा पंचनामा करण्यात आला. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रकाराकडे गटविकास अधिकार्यांचा कानाडोळा होत असल्याने त्यांच्यावर संशयाची सुई व्यक्त होत आहे. ग्रामसेवक दीपक तायडे यांना पाठीशी घालण्याचे कारण काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
गटविकास अधिकार्यांची झपाई
वांजाळ्याचे ग्रामसेवक तायडे यांच्याकडे पदभार का काढून घेतला नाही? याबाबत गटविकास अधिकारी सुभाष मावळे यांची जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी चांगलीच झपाई केली. प्रसंगी पंचायत समिती सभापती सुनील नेहेते, पाटणकर साहेब यांनी पंचनामा केला. ग्रामपंचारत दप्तरामध्ये अफरा-तफरी आढळली तसेच ग्रामपंचायतीचे संगणकदेखील असल्याचे सांगण्यात आले. गटविकास अधिकार्यांनी तायडे यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याबाबत सदस्यांना सूचित केले. यावेळी सरपंच नरेंद्र पाटील, उपसरपंच देविदास सावळे, सदस्य संगीता तारडे, शोभा पाटील, मंगलाबाई भील रांची उपस्थिती होती.