नवी दिल्ली –व्यापारी आणि ट्रेडर्स 24 जुलैपासून जीएसटीएनच्या पोर्टलवर आपल्या विक्री आणि खरेदीचे इनव्हॉइस अपलोड करू शकतील. पोर्टलवर 1 जुलैनंतर जनरेट झालेले इनव्हॉइस अपलोड करता येतील. जीएसटीच्या आयटी नेटवर्कचे काम पाहणार्या जीएसटीएन नेटवर्कने ही माहिती दिली.
जीएसटी नेटवर्कचे चेअरमन नवीन कुमार म्हणाले, आम्ही 24 जुलैपासून या पोर्टलवर इनव्हाइस अपलोड करण्याची सुविधा सुरू करणार आहोत. यामुळे व्यापारी आपल्या पातळीवर दररोज किंवा आठवड्यातून केव्हाही इनव्हाइस अपलोड करू शकतील. यामुळे महिन्याच्या शेवटी इनव्हॉइस अपलोड करण्याच्या त्रासातून सुटका होईल.