जीएसटी म्हणजे विकास, सजगता आणि पारदर्शकता-मोदी

0

नवी दिल्ली- वस्तु आणि सेवा कर लागू करण्याच्या निर्णायाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या व्टिटरवरून जीएसटी म्हणजे विकास, सजगता आणि पारदर्शकतेचे उत्तम उदाहरण असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी जीएसटीमुळे संघटीत व्यवसाय आणि उत्पादन क्षमतेला तसेच लघु उद्योगांना चालना मिळत असल्याचे म्हटले आहे. ‘मन की बात ‘ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी सहकारी संघवादाचे एक उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले होते.