केपटाऊन । दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमला झटका देत अष्टपैलू जीन पॉल ड्युमिनीने एक मोठा निर्णय घेतलाय. ड्युमिनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे जाहीर केल आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने शनिवारी ड्युमिनीच्या निवृत्तीच्या निर्णयाची घोषणा केली. परंतु, ड्युमिनी एकदिवसीय आणि टी-20 मध्ये आपलं करिअर पुढे सुरूच ठेवणार आहे. यावर्षी जुलै महिन्यात इंग्लंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या कसोटी मालिकेनंतर ड्युमिनीला दक्षिण आफ्रिकेच्या संघामधून हटवण्यात आले होते.
कसोटी क्रिकेटमधील आपल्या कारकिर्दीतील 46 सामन्यांमध्ये ड्युमिनीने 2013धावा बनवल्या आणि 42 विकेट्स मिळवल्या होत्या. 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात ड्युमिनीने कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल टाकलं होतं… आणि पहिल्याच सामन्यामध्ये अर्धशतक ठोकून आपल्या नावाचा दबदबाही निर्माण केला होता.