जीर्ण पडती अंगावर कोसळल्याने टोस्ट विक्रेता जखमी

0

भुसावळातील घटना ; पालिकेची ईमारत नागरीकांच्या जीवावर

भुसावळ- शहरातील पालिकेची डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील जीर्ण ईमारत नागरीकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. यापूर्वी जीर्ण इमारतीच्या पडतीचा भाग अंगावर कोसळून नागरीक जखमी झाल्याच्या घटना घडल्या असतानाच गुरुवारीदेखील ईमारतीखाली दुध, टोस्ट विक्री करणारे व्यावसायीक सैय्यद जाकीर तैय्यबअली (45, रा.जाम मोहल्ला, भुसावळ) यांच्या डोक्यावर पडतीचा भाग कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे ईमारतीखाली व्यवसाय करणार्‍या विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. जखमी अवस्थेतील सैय्यद जाकीर यांना रुग्णालयात हलवल्यानंतर त्यांच्या डोक्याला तीन टाके पडल्याचे सांगण्यात आले तर त्यांना चक्कर येवू लागल्याने अधिक उपचारार्थ जळगाव येथे सीटी स्कॅनसाठी हलवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

जीर्ण ईमारत जीवावर
पालिकेची ईमारत जीर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने पालिकेचे गोपाळ नगरात स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते मात्र अद्यापही काही विक्रेत्यांची दुकाने पालिकेच्या दर्शनी भागात आहे त्यामुळे अप्रिय घटना घडल्यास जवाबदार कोण? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. पालिकेने तातडीने याबाबत दखल घेवून जीर्ण ईमारत पाडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.