जीर्ण पुलांसह महामार्गाचे कामे त्वरीत सुरू करा

0

जळगाव। जिल्ह्यातील जीर्ण झालेल्या पुलसांसह राष्ट्रीय महामार्गाचे कामे त्वरील सुरू करण्यात यावी, अशा मागणीचे निवदेन जळगाव जिल्हा लिगल सेलतर्फे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले आहे. काही दिवसातच पावसाळ्याला सुरू होत असून मागील वर्षी सावित्री नदीवर असलेला पुल पुरात वाहून मोठी दुर्घंटना घडली होती. त्यामुळे तश्या प्रकाराची पुनरावृत्ती होवून नये म्हणून जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील जीर्ण पुलांचे नुतणीकरण करण्यात यावे. तर जळगाव-नागपुर महामार्गावर अनेक अपघात घडत आहेत. त्यामुळे महामार्ग चौपरीकरणाचे काम त्वरीत सुरु करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून पालकमंत्र्यांना करण्यात आली आहे.

यावेळी निवेदनावर जळगाव जिल्हा लिगल सेल जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सचिन पाटील, अ‍ॅड. संजयसिंग पाटील, संदिप पवार, अ‍ॅड. प्रविण राक्षे, अ‍ॅड. संदिप कोळी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.