जळगाव। संघर्ष घरात, गावात, कामाच्या ठिकाणीही घडू शकतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारची चूक नसुन बळी पडलेल्या आपल्यासारख्या व्यक्तींना अशा प्रकारच्या सामजिक घटकांना सामोरे जावे लागते. सुख दुख:त पाठबळ देणारा, जगण्याला स्पुर्ती देणारा, हिंमत देणारा, जीवनात संकटकाळी मदत करणारा खरा मित्र असतो. खरे तर समाजात चांगले लोक भरपूर असतात परंतु त्यांच्या हातून चांगले काम करण्याची संधी त्यांना मिळत नाही. जिवंतपनी जगण्याचा आनंद घ्या दुख:ला कुटुंबाचा सदस्य बनवू नका. त्यालाही आनंद काय असतो जरा अनभवू द्या म्हणजे तुमच्या जीवनात आनंदाचा वर्षाव होईल.
परंतु एक सामाजिक घटक म्हणून माणसाला माणूस म्हणून माणुसकी महत्वाची असायला हवी असे मत जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी व्यक्त केले. जी.एच रायसोनी बिझनेस मेनेजमेंटमध्ये आयोजित समर्पण या कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील एचआयव्ही बाधीत रुग्णाना श्रीखंड पुरीचे जेवण देण्यात आले. तसेच सकस आहाराचे देखील वाटप करण्यात आले.
समस्या सोडविण्याची संधी
विद्यार्थी हा फक्त शिक्षण घेणारा व्यक्ती न राहता तो प्रामाणिक माणूस म्हणून घडावा. त्याच्याही सामाजिक संवेदना जागृत व्हाव्यात. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना याची जाणीव व्हावी तुमच्या समस्या तुमचे प्रश्न समजून त्यांना ते सोडविण्याची संधी मिळावी यासाठी हा उपक्रम घेण्यात आला असल्याचे मत संचालिका डॉ.प्रिती अगरवाल यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी यांनी मुलांना पुढच्या वेळी काय जेवण करण्याचे असे विचारले असता मुलांनी पिझ्झा आणि पाव भाजी खाण्याची इच्छा व्यक्त केली. आंब्याचा रस पुरी व दंगल चित्रपट जसा दाखविला तशी पिझ्झा आणि पाव भाजी खाण्याची इच्छा पूर्ण करेन असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले. जिल्हाधिकारी यांनी दाखविलेल्या मायेमुळे विद्यार्थी भारावले होते.
विद्याथ्यार्ंनी केले नृत्य
सुरुवातीला विद्यार्थ्यांना प्रा.शमा पोतनीस यांनी वेगवेगळे खेळ घेऊन मनोरंजन केले. पालकांचेही खेळ घेतले. काही पालकांनी गाणी व कविता म्हटली तर विद्यार्थ्यांनी झिंगाट गाण्यावर नृत्य केला. प्रसंगी सूत्रसंचालन व आभार प्रा.विजय गर्गे यांनी मानले. याप्रसंगी उपचेअरमन अविनाश रायसोनी, कार्यकारी संचालक प्रितम रायसोनी, संचालिका डॉ.प्रिती अगरवाल, जनसंपर्क अधिकारी फारूख शेख, अंकुर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मनीषा बागुल, उपाध्यक्षा संगीता पाटील, खजिनदार आशा चौधरी, श्रम साफल्य महिला बचत गट प्रमुख त्रिवेणी माळी यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.