जीवनात गुरूचे स्थान मोलाचे -सुमित्रा गांगुर्डे

0

भुसावळ- शहरातील रेल्वे स्कुलमध्ये शिक्षक दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुमित्रा गांगुर्डे होत्या. त्या म्हणाल्या की, जीवनात गुरुचे स्थान खूप मोठे आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरुंचे मार्गदर्शन मोलाचे ठरते. प्राचार्य सतीश कुलकर्णी यांनी देखील शिक्षक दिवसाचे महत्व विषद केले तसेच विद्यार्थ्यांची समयोचित भाषणे झाली. सांस्कृतिक कार्यक्रम झाला. बारावीचे विध्यार्थी शिक्षक झाले होते. त्यांनी वर्गांमध्ये जाऊन इतर विद्यार्थ्यांना शिकविले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्राचार्य सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष उपाध्याय यांनी केले.