भुसावळ । महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचा खर्च त्यांना मिळणार्या 17.5 टक्के ईटीपी मधून भागविण्यात येत होता. यानंतर करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार पाणी पुरवठा व्यवस्थापन व नियोजन तसेच कार्यान्वय स्थानिक संस्थेकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे. याचा परिणाम महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या उत्पन्नाचे स्त्रोत अतिशय कमी झाले आहे. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा आस्थापना खर्च भागविणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. त्यामुळे अधिकारी कर्मचार्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून मंगळवार 7 रोजी आंदोलन करण्यात आले.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही महाराष्ट्रातील नागरी व ग्रामीण पाणी पुरवठा करणारी शासनाची अंगीकृत संस्था आहे. सध्याची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणही संस्था पुर्वीच्या पाटबंधारे विभाग, नगरविकास विभागाच्या अखत्यारित पाणी पुरवठा शाखा म्हणून कार्यरत होती. परंतु राज्यातील नागरि व ग्रामीण पाणी पुरवठा आणि जल:निसारण कार्यक्रम जलदगतीने विकास व नियमन करण्याच्या अनुषंगाने अधिनियम 1976 अन्वये महाराष्ट्र पाणी पुरवठा व जलनि:सारण मंडळ म्हणजेच आताचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण स्थापित करण्यात आले व महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचा खर्च त्यांना मिळणार्या 17.5 टक्के ईटीपी मधून भागविण्यात येत होता.
आमदारांची शिफारस
त्यामुळे अधिकारी कर्मचार्यांमध्ये असंतोष असून आंदोलन करण्यात आले. पिण्याच्या पाण्याची मानवी मुलभूत गरज भागविण्यासाठी शासनाचे विविध कार्यक्रमाचे नियोजन व नियमन करणारी शासनाची अंगीकृत संस्था सुरळीत चालावी व त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेस व्हावा या उद्देशाने सध्याच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचार्यांचे वेतन व निवृत्ती वेतनाचे दायित्व शासनाने स्विकारावे अशी शिफारस आमदार संजय सावकारे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
प्राधिकरणाच्या उत्पन्नाचे स्त्रोत झाले कमी
यानंतर 12 व 13 व्या दुरुस्तीनुसार पाणी पुरवठा व्यवस्थापन व नियोजन तसेच कार्यान्वय स्थानिक संस्थेकडे हस्तांतरीत करण्यात आल्याने महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या उत्पन्नाचे स्त्रोत अतिशय कमी झाले आहे. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा आस्थापना खर्च भागविणे दिवसेंदिवस कठीण होत आहे.
यांनी घेतला सहभाग
6 रोजी पासून सुरु झालेल्या महाराष्ट्र प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीच्या राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागीय अधिकारी बी.सी. पाटील, शाखा अभियंता एस.पी. लोखंडे, एच.एच. पठाण, वरिष्ठ लिपीक सी.तु. धांडे, कनिष्ठ लिपीक सी.व्ही. सोनार, एस.आर. महाजन, डी.एम. पाटील, ए.एस. सोनार, के.के. भारंबे, व्ही.आर. जैन, यु.जी. सैय्यद, आर.आर. चौधरी, एस.बी. सुरवाडे, एन.पी. सोनवणे आदी कर्मचारी सहभागी झाले होते.