जी.एच. रायसोनी अभियांत्रिकीचे जलतरण स्पर्धेत विजेतेपद

0

जळगाव: येथील जी.एच,रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जलतरण स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून चार स्पर्धांमध्ये प्रथम पारितोषिक पटकाविले आहे. महिला गटात ब्याक स्ट्रोक ५० मी. निकिता फिरके प्रथम, ५० मी फ्रीस्टाईल द्वितीय, १०० मी. फ्रीस्टाईल निकिता फिरके प्रथम तर द्वितीय क्रमांक बिझनेस मेनेजमेंट मधील दर्शिता सोनवणे या विद्यार्थिनीने पटकाविला. पुरुष गटात ५० मी. व २०० मी. फ्रीस्टाईल प्रकारात अजिंक्य वडनेरे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले. निकिता व अजिंक्य महाविद्यालयात अंतिम वर्ष अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत तर दर्शिता मेनेजमेंटचे शिक्षण घेत आहे.

नुकत्याच झालेल्या जलतरण स्पर्धा मू.जे.महाविद्यालयात पार पडल्या. स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल कार्यकारी संचालक प्रीतम रायसोनी, संचालिका डॉ.प्रिती अगरवाल, प्रभारी प्राचार्य प्रा.हरीश भंगाळे यांनी अभिनंदन केले. इन्स्टिट्यूटचे क्रीडा संचालक प्रा.संजय जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.