जी.एस.टी सगळ्यांनाच ठरणार लाभदायक

0

जळगाव। 1 जुलै17 पासून जी.एस.टी. सेवा प्रणाली लागू होणार असल्याने त्यानिम्मिताने जिल्हा बँकेच्या छत्रपती शिवाजी महारज सभागृहात 21 जून रोजी सेवाकर सल्लागार प्रकाश एम. प्रभुदेसाई यांनी जिल्हा बँकेच्या सर्व कर्मचारी व अधिकार्‍याना जी.एस.टी नोंदणी कशा प्रकारे करावी तसेच जी.एस.टी चे वेगवेगळे प्रकार तसेच नियम, बँकेने घेतलेल्या सेवाकरावरील होणारे लाभ व फायदे या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

जी.एस.टी फायदेशीर
जिल्हा बँकेत आयोजित जी.एस.टी मार्गदर्शन कार्यक्रमात माहिती देताना, जिल्हा बँकेच्या कामकाजात जी.एस.टी फार महत्वाचा भाग बनलेला असून यांचा फायदा तितकाच असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योग व्यवसायात दर निश्चित करण्यासाठी मोठे निर्बंध जी.एस.टी मुळे येणार आहे. यावेळी अधिकारी पाठक, बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, सरव्यवस्थापक एम.टी.चौधरी, व्यवस्थापक प्रकाश भटा पाटील, हटेसिंग हिलाल पाटील, अतुल तोंडापुरकर, प्रल्हाद सपकाळे, बँक कर्मचारी युनियनचे अध्यक्ष हेमंत अमृतराव साळुंखे यांच्यासह मुख्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.