जुगाराचा डाव उधळला : दहा जुगारी जाळ्यात

यावल : शहरातील खिर्णीपुरा भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर यावल पोलिसांच्या पथकाने छापा टाकत दहा जुगारींना अटक केली. शहरातील बुरूज चौकाच्या पुढे खिर्णीपुरा असून तेथे जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी टापा टाकून जुगार्‍यांना ताब्यात घेतले.

यांनी केली कारवाई
सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, सहायक फौजदार असलम खान, गणेश ढाकणे, गणी मिर्झा, अलाउद्दीन तडवी, मोहन तायडे यांच्या खिर्णीपुरा भागाती शहाबुद्दीन चिरागोद्दीन यांच्या घरासमोरील अंगणात सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यावर छापा टाकत अमोल राहुल सुरवाडे (सिध्दार्थ नगर), रमजान खान सुभान खान (खिर्णीपूरा), अझरुद्दीन शहाबोद्यीन (आयशा नगर), रफिक शेख कालु, नईमखान सलीम खान, अरीफ खान गनी खान, सईदखान शाहिखान, शेख जफर शेख शकील, जफरशहा रहेमान शहा व शेख समसोद्यीन शेख कुतूबुद्दीन (सर्व रा.खिर्णीपुरा) यांना अटक करण्यात आली. संशयीतांच्या ताब्यातू 10 हजार 150 रुपयांची रोकड व पत्ता जुगाराची साधन जप्त करण्यात आली.