जुगार खेळणारे 5 जण पोलीसांच्या ताब्यात

0

चाळीसगाव । शहरातील प्रभात कॉलनी येथे झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळणार्‍या 5 जणांना चाळीसगाव शहर पोलीसांनी 11 फेब्रुवारी 2018 रोजी रात्री 9.45 वाजता ताब्यात घेवुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. शहरातील प्रभात कॉलनीत नामदेव शंकर कुमावत यांच्या घराजवळ जुगार सुरु असल्याची माहिती शहर डी बी पथकाला मिळाल्यावरुन पोलीस निरीक्षक रामेश्‍वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शशिकांत पाटील, पो.कॉ.बापुराव पाटील, राहुल पाटील, कर्तारसिंग परदेशी, प्रवीण सपकाळे यांनी 11 फेब्रुवारी 2018 रोजी रात्री 9.45 वाजता छापा मारुन झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळणारे शेख शफी शेख अमीर (वय-28) रा प्रभात गल्ली चाळीसगाव, सादीक शेख कासम (वय-26) रा हुडको कॉलनी, शांताराम विट्ठल भोई (वय-25) रा नागदरोड झोपडपट्टी, सागर पुनम नकवाल (वय-24) रा मेहतर कॉलनी व परेश कैलास सोनटक्के (वय-20) रा. प्रभात गल्ली चाळीसगाव यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून 52 पत्याचा कॅट व 22 रुपये रोख हस्तगत करुन त्यांच्यावर मुंबई जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे कारवाई करण्यात आली असून तपास हवालदार शशीकांत पाटील करीत आहेत.