जुनवणे येथील शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

0

लोणखेडा। शहादा तालुक्यातील जुनवणे येथील जि.प.शाळेत शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी उषा पेंढारकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व याविषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी सवांद साधला. प्राथमिक शिक्षण अधिनियमा नुसार प्रत्येक बालकाला शिक्षण घेण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.शिवाजी ठाकुर उपस्थित होते त्यांनी गणित प्रगल्भीकरण, स्पोकन इंग्लिश,तंत्र स्नेही इ.माध्यमातून ’डायट’मार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे.या माध्यमातून गुणवत्ता विकास साधण्याचे काम सुरु आहे असे प्रा.ठाकुर यांनी स्पष्ट केले.

पानाफुलांनी सजवलेल्या छोट्या ट्रॅक्टरवर मिरवणूक
’डायट’ चे उदय केदार, सरपंच सखुबाई भील,शा.व्य.अध्यक्ष मायाबाई ठाकरे, उपाध्यक्ष छोटू भील,सदस्य संजय जगदेव, प.स.सदस्य शिवाजी भील, मुख्याध्यापिका हीराबाई जगताप, मुख्याध्यापक अमृत संतोष पाटील,भीला निळे ,सुनीता गोसावी,प्रकाश ठाकरे,गणेश गवळे व् म्हसावद केंद्रातील शिक्षक उपस्थित होते.शि.वि.अधिकारी डी.टी.वळवी यांनी मनोगत व्यक्त केले.लोणखेड्याचे केंद्र प्रमुख डी.के.खोडे यांनीही उपस्थिति दिली. उपक्रमात रंगबेरंगी पानाफुलांनी सजवलेल्या छोट्या ट्रैक्टर वर विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात अगदी मनसोक्त आनंद घेत मिरवणूक काढली. व इ.पहिलीत दाखल विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प,पाठ्यपुस्तके व् मिठाई देऊन स्वागत करण्यात आले.तसेच सूत्रसंचालन गौरी नानवळकर यांनी केले तर आभार हीराबाई जगताप यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनराज पाटिल, मुकुंद पाटील.दीपक पवार,मनीष कुंदे यांनी परिश्रम घेतले.