भुसावळ । शहरातील जळगाव रोडवरील जुना सातारा भागातील मुख्य रस्त्यावरील पथदिवे व मोठा हायमास्ट मागील दोन वर्षापासून बंद आहेत. या भागात असलेला मोठा हायमास्ट मागच्या वर्षी गुडीपाडव्याला काही अंशी दुरुस्त करण्याचा प्रयन्त केला गेला होता. परंतु तो आता बंदच आहे. लाखो रुपये खर्च करून उभारलेली वस्तु वापरात नसेल तर निधीचा अपव्यव होत असल्याचे दिसून येत आहे.
काळोखाचा गैरफायदा घेऊन चोरीचे प्रकार वाढले
जुना सातारा भागात गुढीपाडव्याला मरिमातेची जत्रा असते. यामध्ये महिला वर्ग, तरुण मुलींचा जास्त सहभाग असतो. परिस्थिती अशीच राहिल्यास चोरांचे प्रमाण काही प्रमाणात वाढू शकते. पथदिवे गेले काही दिवस बंद असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. येथे येणार्या नागरिकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर असतेे. येथे असलेले पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळेस काळोखाचा फायदा घेऊन परत सोनसाखळी चोरण्याचे प्रकारही होऊ शकतात. पालिका प्रशासनाने यात लक्ष घालून या भागांमधील पथदिवे तातडीने चालू करण्याची गरज आहे. या भागात काही छोटे हायमास्टसुद्धा आहेत. परंतु त्यांचा व्यवस्थितपणे प्रकाश नसल्यामुळे परिसर अंधारमयच असतो याचीही सुद्धा दुरुस्ती करणे गरजेचे आहे. गुडीपाडव्याआधी कमीत कमी जुना सातारा भागापासून गणेश कॉलनी पर्यंतचे सेंट्रल पोलवरील पथदिवे दुरुस्त करावे अशी मागणी होत आहे.