जुने जळगावात फावडा मारून प्रौढाचे डोके फोडले

0

जळगाव। घराजवळील खडी व रेती आवरण्याच्या कारणावरुन शेजार्‍यांमध्ये झालेल्या भांडणाचे रुपांतर हाणामारीत होवून 48 वर्षीय इसमाच्या डोक्यात पावडा मारुन दुखापत करण्यात आली असून महिलांना मारहाण झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

जुने जळगावातील बुनकरवाडा येथे मुरलीधर शंकर मगरे यांच्या दवाजाच्या जवळ असलेली रेती व खडी आवरण्याच्या कारणावरुन शेजारील राजवत कुटूंबाशी भांडण होवून विशाल राजवत, सचिन राजवत, टकू उर्फ प्रभाकर राजवट यांनी मुरलीधर मगरे यांच्या डोक्यात पावडा मारला. यात ते गंभीर जखमी झाले. तसेच त्यांची पत्नी मंगला मुरलीधर मगरे, बहिण चंद्रकला शंकर मगरे यांना देखील मारहाण करण्यात आली. मुरलीधर मगरे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून शनीपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी भेट देवून गेले. उशीरा पर्यंत गुन्हा नोदंवीण्याचे काम सुरू होते. सदर मिळालेली माहिती ही जिल्हा रूग्णालयात दाखल असलेल्या जमखींनी दिली आहे.