March in Delhi in September for old pension scheme भुसावळ : भुसावळ व वरणगाव ऑर्डनन्समध्ये 1 जानेवारी 2004 नंतर सरकारी सेवेत रुजू झालेल्या कर्मचार्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली मात्र जुनीच पेन्शन योजना कायम ठेवण्याच्या मागणीसाठी दिल्ली संसद भवन, जंतर मंतर नवी 26 सप्टेंबर 2022 रोजी आंदोलन होणार आहे. या आंदोलनात सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे. अखिल भारतीय संरक्षण कामगार महासंघाचे महासचिव सी.श्रीकुमार (चेन्नई) यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सर्व संलग्न 423 युनियन मोर्चात सहभागी होतील.
भुसावळात कर्मचार्यांची बैठक
आयुध निर्माणी भुसावळच्या कर्मचार्यांनी महासचिव व मेंबर स्टाफ साईड जेसीएम 3 दिनेश राजगिरे, अध्यख आशिष मोरे यांच्या उपस्थितीत शनिवारी बैठक घेण्यात आली. त्यात दिल्ली चलोचा नारा देण्यात आला. जे कामगार पदाधिकारी 26 सप्टेंबर 2022 रोजी दिल्ली मोर्चात सहभागी होऊ शकणार नाहीत, असे कामगार व पदाधिकारी स्थानिक स्तरावर नवी पेन्शन रद्द करून जुनी पेन्शन स्कीम लागू करण्यासाठी विरोध प्रदर्शन करणार आहेत तसेच सकाळी कामावर काळ्या फिती लावतील व धरणे आंदोलन करतील, असे ठरले. सभेत कामगार युनियनचे निलेश देशमुख, हिरालाल पारीसकर, मोहन सपकाळे, किशोर बढे, योगेश आंबोडकर, किशोर कोळी, नितीन देशमुख, मिलिंद ठोंबरे, शेख शकील, फारुकी, एन.डी.पाटील, गजू इंगळे, रीतेश तायडे, प्रवीण पाटील, मामा बाविस्कर आदींची उपस्थिती होती.