जुन्या वस्तू देण्याचे मंगळ ग्रह सेवा संस्थेचे आवाहन

0

अमळनेर। येथील मंगळग्रह सेवा संस्था अनाथ, गरीब मुले-मुली आणि वृध्दाश्रमातील मंडळी यांच्यासाठी गरजेच्या वस्तुंचा पुरवठा करणार आहे. यासाठी सर्वांना आवाहन करण्यात आले आहे की, आपल्याकडील जुन्या मात्र इतरांना वापरता येतील अशा वस्तू आपण श्री मंगळदेव ग्रह मंदिर येथे आणून द्या.

नागरिकांनी शालेय, महाविद्यालयीन जुनी पुस्तके, नोट्स, वह्या, कोरी पाने, दप्तर, कंपास, डिसेक्शन बॉक्स, टीफिन बॉक्स, पाण्याची बॉटल, पेन, पेन्सिल, खेळणी, जुने कपडे, चादरी, बेडशीट्स, स्वेटर, मफलर, कानटोपी, शॉल, हातमोजे, रेनकोट, छत्री खान-पानाचे टिकाऊ पदार्थ आदी आणून द्यावेत. गोळा झालेल्या साहित्याची विभागणी करुन वापराजोगे साहित्य हे अनाथ,गरीब, गरजु मुला- मुलींसह वृध्दाश्रमातील मंडळींना वाटप केले जाईल, असे संस्थेच्या विश्वस्तांनी विनंतीवजा आवाहन केले आहे.