Shocking : Youth killed in Jalgaon due to old dispute जळगाव : जुना वाद उफाळून आल्याने शहरातील तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवार, २० डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परीसरात घडली. चाकूहल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. आकाश सुरेश सपकाळे (३०, रा.कोळी पेठ, जैनाबाद, जळगाव) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
हाणामारीत मारला चाकू
जळगाव शहरातील नवीन बसस्थानक येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणमारी होऊन धारदार शस्त्राने सपासप वार करून आकाश सुरेश सपकाळे (कोळी पेठ, जैनाबाद) या तरुणाची हत्या करण्यात आली. चाकू हल्ल्यात मयताचा भाऊ सागर सुरेश सपकाळे आणि सागर आनंदा सपकाळे हे दोन जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलिीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड यासह जिल्हापेठ व शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनांसाठी दाखल झाले.