In Nimkhedi, a tractor ran over an adult’s feet and then beat him up with a stick: Crime against the trio मुक्ताईनगर : तालुक्यातील निमखेडी खुर्द गावात जुन्या वादातून प्रौढाच्या पायावरून ट्रॅक्टर नेत त्यास काठीने मारहाण करीत शिविगाळ करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 7.14 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी तिघांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
जुन्या वादातून केली मारहाण : पायावरून ट्रॅक्टर चालवले
संदीप रामदास पवार (52, निमखेडी खुर्द, ता.मुक्ताईनगर) यांच्या तक्रारीनुसार, 26 ऑगस्ट रोजी रात्री अडीच वाजता ते ओट्यावर असले असताना संशयीत आरोपी योगेश व्यवहारे हा वाड्यातून ट्रॅक्टर घेवून जात असताना त्यास पुढे जाण्यास रस्ता नाही, असे सांगितल्याचा राग आल्याने व जुन्या वादाच्या कारणातून पवार यांच्या दोन्ही पायावरून ट्रॅक्टर चालवण्यात आले तसेच दिलीप व्यवहार व अन्य सात ते आठ जणांनी काठ्यांनी मारहाण केली तसेच शिविगाळ केली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात योगेश व्यवहारे, दिलीप व्यवहारे व अन्य सात ते आठ संशयीतांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय संजीव पाटील करीत आहेत.