जुन्या वादातून महिलेला मारहाण करीत विनयभंग : एरंडोल तालुक्यातील घटना

धरणगाव : जुन्या वादातून एरंडोल तालुक्यातील एका गावातील महिलेला मारहाण करण्यात आली व विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसात तक्रार दिल्याचा राग
एरंडोल तालुक्यातील एका गावातील 42 वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. याच गावातील अशोक सोनवणे यांच्याशी त्यांचा वाद होता. याबाबत महिलेने यापूर्वी पोलिसात तक्रार दिल्याने याचा राग मनात ठेवून अशोक सोनवणे याने मंगळवार, 3 मे रोजी सकाळी 10 वाजता विवाहितेला अश्लिल शिविगाळ करून महिलेला मारहाण केली तसेच तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. या प्रकरणी महिलेचा फिर्यादीवरून संशयीत आरोपी अशोक सोनवणे विरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल अरुण निकम करीत आहे.