जुलैअखेर होणार शासकीय नोकरभरतीला सुरुवात!

1

नागपूर- सरकारी नोकरी लागावी यासाठी प्रयत्न करणाऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या ७२ हजार जगाच्या नोकरभरतीसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील ३६ हजार जागांसाठी या महिन्याच्या अखेरीस सर्व विभागाच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहे. सर्व परीक्षा राज्यभरात एकाचवेळी एकाच दिवशी महापोर्टलमार्फत घेण्यात येणार आहेत. ३१ जुलै अखेरपर्यंत कृषी आणि पदुम, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, गृह विभाग, आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, मृदा व जलसंधारण विभाग या विभागातील रिक्त पदांसाठी जाहिरात निघणार आहे. त्यांच्या विभागाच्या विभागप्रमुखांनी १७ जुलैपर्यंत रिक्त पदांची माहिती ही राज्य सरकारला कळवायची आहे. त्यानंतर महिना अखेरपर्यंत सर्व पदांच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहे.

गेल्या २० वर्षात कधी नाही झाली इतकी मोठी भरती यावर्षी होणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशाना दरम्यान सांगितले.