‘जुळले नाते रक्ताचे’ गोळवलकर रक्तपेढीचा उपक्रम

0

जळगाव : गरजेच्या वेळी रुग्णाला, रक्तदान करतांना किंवा रक्त घेतेवेळी एवढेच काय संबंध रक्तपेढीशी येतो. या पलीकडे रक्तपेढीशी संबंध येत नाही किंवा येण्याचे कारणही नाही. त्यामुळे रक्तपेढीच्या इतर कार्याची माहिती नसल्यामुळे अनेक गैरसमज समाजात असतात. जसे जुजबी टेस्टिंग करून रक्त देतात, आपणच दिलेल्या रक्ताची भरपूर किंम्मत मोजावी लागते. असे अनेक गैरसमज आहे. जुळते नाते रक्ताचे या उपक्रमा अंतर्गत विविध क्षेत्रातल्या व्यक्तींना रक्तपेढीत बोलावून त्यांना रक्तपेढीत अंतर्गत चालण्यार्‍या कार्याची माहिती देणे जेणे करून समाजात असलेले रक्तपेढी संदर्भातील गैरसमज दूर होण्यास मदत होईल अशा मूळ उद्देश या उपक्रमाचा आहे. जुळते नाते रक्ताचे या उपक्रमा अंतर्गत प्रतिष्ठीत केमिस्ट डॉ.विल्सन फार्माचे संचालक लखीचंद जैन जळगाव. व संचालक परेश रिसोर्ट उमाळा व सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बर्‍हाटे यांनी गोळवलकर रक्तपेढीस भेट दिली दोघांनी संपूर्ण रक्तपेढीची पाहणी करून उत्साहाने माहिती जाणून घेतली.

संचालक मंडळाकडून दोघांचा सत्कार
या प्रसंगी प्रमोद बर्‍हाटे यांनी अनेक वेळा रक्तदान केले असतांना देखील रक्तपेढीच्या अंतर्गत कामकाजाची माहिती पहिल्यांदा होत असल्याची भावना व्यक्त केली. तर लखीचंद जैन यांनी शासकीय नियमाचे काटेकोर पालन करून रक्तपेढीचे व्यवस्थापन करणे हे वारेवरच्या कसरती सारखे आहे. असे प्रतिपादन केले. याप्रसंगी रक्तपेढीचे संचालक डॉ.रवी हिरानी, संजय नारखेडे, डॉ. नितीन चौधरी, किरण बच्छाव, दीपक जोशी, तुफान शर्मा आदी.