नवापूर । महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनचे जिल्हाधिकारी कार्यालयावर रणरणत्या उन्हात घंटानाद आंदोलन करण्यात आले,सायंकाळ पर्यत घंटानाद करुन सरकारचे लक्ष वेधण्यात आले. जूनी पेंशन मागणी व 23 ऑक्टोबर 2017 चा शासन निर्णय विरोधात जुनी पेंशन हक्क संघटन उतरली असुन जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन नंदुरबारद्वारा जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व कर्मचारी यांना 1982-84 ची जुनी पेंशन योजना लागु करणे आणि 23/10/2017 चा वारिष्ट वेतन श्रेणी व निवड श्रेणीपासुन शिक्षकांना वंचित ठेवणारा शासन निर्णय रद्द करावा या मागणीसाठी घंटानादसह धरणे आंदोलन करण्यात आले. 31 आँक्टोबर 2005 नंतरच्या कर्मच्यार्यांना जुनी पेंशन योजना नाकारुन देशोधडीला लावण्याचे कट कारस्थान रचले गेले. एवढेच नाही तर या नवीन पेंशन योजनेत मयत झालेल्या कर्मचार्यांना शासनाकडून आज रोजी कसलाही लाभ मिळालेला नाही. राज्य सहकार्याध्यक्ष कुणाल पवार यांनी मार्गदर्शन केले.
यांची होती प्रमुख उपस्थिती
यावेळी तुषार सोनवणे, संदिप रोकडे, अशोक बागले,शैलेंद्र रघुवंशी, गजानन मराठे, जागृती नानकर, तालुकाध्यक्ष प्रविण परदेशी, हिकमत बोडखे, अभिषेक काकड, पंकज होडगर, वाघंबर कदम, दयानंद जाधव, राहुल पवार, जिल्हा व तालुका पदाधिकारी आदींनी सहकार्य केले अशी माहिती संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख निलेश पाटील यांनी दिली. या आंदोलनासाठी संदिप रायते. शैलेंद्र रघुवंशी ,गजानन मराठे, तुषार सोनवणे,अशोक बागले. संदिप रोकडे आदिनी परिश्रम घेतले. यावेळी संदिप रायते,कृणाल पवार रविंद्र बैसाणे,सतीष पाटील, राकेश आव्हाड,भीमाशंकर कदम,मोहन भुषणरीया,दादाभाई पिंपळे,आबासाहेब अहिरे,यांनी मनोगत व्यक्त केले तसेच जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. सुत्रसंचालन अशोक बागले यांनी केले.सायंकाळ पर्यत घंटानाद करण्यात आला हजारो संख्येने डि सी पी सी यावेळी उपस्थित होते.