चाहत्यांनी अभिनेत्रींशी गैरवर्तन करण्याचा प्रकार बॉलिवूडसाठी नवीन नाही. नुकतेच एलियाना डिक्रुझने मुंबईत तिला आलेला अनुभव शेअर केला होता. त्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत सेल्फी घेण्याच्या बहाण्याने दोघा चाहत्यांनी तिच्याशी गैरवर्तन केल्याचे वृत्त आहे.
जुडवा 2 चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसाठी काँटेस्ट जिंकलेल्या 50 जुळ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. बक्षीस म्हणून वरुण धवन, जॅकलिन फर्नांडिस आणितापसी पन्नू यांच्यासोबत काही वेळ घालवण्याची संधी त्यांना मिळणार होती. दोघा चाहत्यांना तिच्यासोबत सेल्फी काढायचा होता, मात्र त्यांनी नको तितकी जवळीक साधत जॅकलिनशी गैरवर्तन केल्याचा आरोप होत आहे. अखेर अभिनेता वरुण धवने मध्यस्थी करत दोघांना हाकलून लावले. मात्र या प्रकारामुळे तीन कलाकारांसोबत चाहत्यांना कमी वेळ घालवता आला.