…जेंव्हा फडणवीस गातात भजन !

0

मुंबई: आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऐतिहासिक राम मंदिराचे भूमिपूजन झाले. आजचा दिवस हिदुस्थानात दिवाळीप्रमाणे साजरा झाला. देशभरात विविध कार्यक्रम झालेत. भाजपच्या सर्व कार्यालयात भूमिपूजन सोहळ्याचा जल्लोष करण्यात आला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चक्क भजन गायले. मुंबईतील भाजपा कार्यालयात फडणवीस यांनी भजन गायले. ‘जागो तो एकबार जागो जागो, जागो तो एकबार हिंदू जागो तो’ हा भजन फडणवीस यांनी गायले.

फडणवीस यांच्यात वेगळीच ऊर्जा यावेळी संचारल्याचे पाहायला मिळाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे आज संपूर्ण भारतीय हा दिवस पाहत आहे. त्यासाठी मोदींचे आभार फडणवीस यांनी मानले. राम मंदिरासाठी ज्यांनी स्वत:चा जीव दिला, त्यांना अभिवादन केले. भव्य मंदिर बनेल त्या मंदिराचे दर्शन घ्यायला आपण जाऊ असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

भाजपने संपूर्ण देशात दिवाळी साजरा करण्याचे आवाहन केले होते. भाजपतर्फे ठिकठिकाणी मिठाई वाटप करून आणि फटक्याची आतिषबाजी करून भूमिपूजन सोहळ्याचा जल्लोष करण्यात आला.