जेईई परीक्षेत दोन विद्यार्थ्यांची आयआयटीसाठी निवड

0

शिरपूर । शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या 17 विद्यार्थ्यांनी जेईई डव्हान्स मध्ये घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर दोन विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँकींगनुसार आयआयटी साठी स्तुत्य निवड करण्यात आली आहे. गेल्या 15 दिवसांपूर्वी आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाच्या तब्ब्ल 17 विद्यार्थ्यांनी जेईई (जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन) मेन-2017 परीक्षेत सुयश प्राप्त केले होते. त्यापैकी प्राची अग्रवाल व कुणाल मगरे या दोन विद्यार्थ्यांची आयआयटीसाठी अंतिम निवड झाली असूनत्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. पटेल इंग्लिश मेडिअम ज्युनिअर कॉलेजचा कुणाल मगरे याने एससी प्रवर्गात 2163 व प्राची मनोज अग्रवालहिने शारीरिक विकलांग प्रवर्गात 318वा क्रमांक मिळविला आहे. या दोघांनी ऑल इंडिया रॅकींग प्राप्त केल्याने कौतूक होत आहे.

यशस्वितेसाठी शिक्षकांचे मार्गदर्शन
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, विद्यमान उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा, प्राचार्य रवि बेलाडकर आदींनी कौतुक केले आहे. सर्व विद्यार्थ्यांना आयआयटी पॉईंट डायरेक्टर अमित जिचकार, ब्रांच हेड, प्रनौती फरकाडे, ब्रांच को-ऑर्डीनेटर संगिनी अपरांती, अंकीत झा, सोहन चौधरी, मनिषा मिश्रा, अरविंद नारायण, मनिष पांडे, विवेक जैन, सलील देवर्षी, सचिन कुमार, राजेश कुमार यांचेही मार्गदर्शन लाभले.