जेनबच्या सेल्फीमुळे विराट, डिव्हिलियर्स शुन्यावर बाद

0

मुंबई। पाकिस्तानला भारताने 124 धावांनी पराभूत केले.मात्र श्रीलंकेच्या बरोबर झालेल्या सामन्यात कर्णधार विराट कोहली हा शुन्यावर बाद होवून तंबूत परतला.कोहलीचे चाहते निराश झाले याचबरोबर त्याच्या चाहत्यांनी दोषक्ष ठरवले आहे ते सामन्याआधी पाकिस्तानी तरूणीने विराट बरोबर काढलेली सेल्फी. त्यामुळे शून्यावर बाद झाल्याचे निकर्ष काढल्या आहे विराटच्या चाहत्यांनी.तर काही चाहत्यांनी या मुलीला अनलकी म्हणले आहे.

चाहत्यांची तरुणीवर नाराजी
चॅम्पियन्स ट्रॉफीमधील दुसर्‍या सामन्यात श्रीलंकेने टीम इंडियाचा सात विकेट्सने पराभव केला. या सामन्यात विराट कोहली शुन्यावर बाद होवून तंबूत परतला.त्याने पाच चेंडूंचा सामना केला, पण त्याला भोपळाही फोडता आला आहे.याला त्याच्या चाहत्यांनी त्याच्या महिला चाहतीला दोषी ठरवले आहे. सामन्याआधी या पाकिस्तानी तरुणीने विराटसोबत सेल्फी काढली आणि तो शून्यावर बाद झाल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.

जेनेब क्रिकेट अनालिस्ट
ती चाहती जेनब अब्बास असून ती पाकिस्तानी टिव्ही अँकर व क्रिकेट अनालिस्ट आहे. तीने श्रीलंकाविरुद्धच्या सामन्याआधी विराटसोबत सेल्फी काढली आणि तो सामन्यात विराट शून्यावर बाद झाला.यापुर्वी तीने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्स सेल्फी घेतली होती.आणि तो पाकिस्तान विरूध्दच्या सामन्यात डिव्हिलियर्स शून्यावर बाद झाला होता. तेही पहिल्याच चेंडूवर.