मुंबई : बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान लवकरच ‘ठग्स ऑफ हिन्दोस्थान’ चित्रपट प्रेक्षकांनसाठी घेऊन येत आहे. अशातच आमिरचे घर शाहरुख खानच्या वार्डरोब ऐवढे असल्याची माहिती समोर आली आहे.
या गोष्टीचा खुलासा स्वतः आमिरने केला आहे. तो म्हणाला, की शाहरुखचे जेवढे मोठे वार्डरोब आहे तेवढे माझे घर आहे. ‘मी शाहरुखला यशस्वी अभिनेत्याच्या दृष्टीने पाहतो. तो खूपच सुंदर आहे, चार्मिंग आहे, खूप छान कपडे घालतो. मी त्याच्या घरी गेलो आहे. त्याने मला त्याचे घर दाखविले, जेवढे माझे घर आहे तेवढे त्याचे वार्डरोब आहे’. त्यानंतर आमिर जोरजोरात हसायला लागला. असे अमीरने खुलासा केला.