जळगाव – मुळजी जेठा महाविद्यालय आणि सोहम् योगा ॲण्ड नॅचरोपॅथी विभागातर्फे ज्येष्ठ नागरीकांसाठी विनामुल्य योग शिबीराचे आयोजन महाविद्यालयाच्या सोहम योग विभागात 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2018 दरम्यान सायंकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. विशेष करून ज्येष्ठ नागरीकांसाठी शिबीर विनामुल्य असून महिला व पुरूष दोघांनीही या सहभागी होता येणार आहे. ज्येष्ठांच्या शारिरीक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक अशा योगसाधनांचा योगिक प्रक्रियांचा अंतर्भाव या शिबीराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरीकांनी या आयोजित शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. शिबीरात सहभागी होण्यासाठी सोहम् योगा ॲण्ड नॅचरोपॅथी विभाग किंवा सायली पाटील (7447810175), शुभांगी पाटील, डॉ.स्नेहल पाटील, अर्चना देवरे आणि लिना पाटील यांच्या संपर्क साधावा.