पिंपरी चिंचवड : बिजलीनगर येथील जेष्ठ नागरिक संघाचा १३ वा वर्धापन दिन सोहळा शनिवार दि. १९ जानेवारी रोजी काशीधाम मंगल कार्यालय, चिंचवड येथे उत्साहात साजरा करण्यात आला. सोहळ्यात प्रथम सत्रात सकाळी ९.३० ते १०.३० पर्यंत पंडित राधाकृष्ण गरड व सहकारी प्रस्तुत सुगम संगीत कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास सर्व जेष्ठ नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे संयोजन सुरेश पुराणिक यांनी केले.
दुसऱ्या सत्राच्या प्रमुख कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून औद्योगिक शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. किसन महाराज चोधरी हे होते. कार्यक्रमासाठी उपमहापौर सचिन चिंचवडे, भाऊसाहेब भोईर, नगरसेवक नामदेव ढाके, सौ. करुणा चिंचवडे, नगरसेविका आशाताई सूर्यवंशी, नगरसेवक रघुनाथ वाघ, नामदेव सोनवणे, लेखापरीक्षक श्रीकांत गुप्ते, जेष्ठ नागरिक महासंघाचे कार्याध्यक्ष सुर्यकांत मुथियान उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. संघाचे अध्यक्ष प्रकाश निसळ यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
सोहळ्यात यावर्षी देखील विविध क्षेत्रात कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यात जयराज श्रीराम काळे, श्रीकांत खंडेराव देशपांडे, ल्क्ष्मण भगवान वायसे, ज्ञानेश्वर बाबुराव शिंदे , उमाकांत आबा सोनवणे, संतोष गोपाल रासने, सौ. प्राजक्ता राहुल रुद्रवार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमातच ‘क्षितिज’ स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ७५ वर्षात पदार्पण केलेल्या जेष्ठ नागरिकांचा सत्कार व विवाहाला ५० वर्ष झालेल्यांचा विवाह सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष मनोहर जांभेकर यांनी संघाच्या कार्याबद्दल प्रशंसा करून शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीमती अनुराधा चैतन्य यांनी मानले. वर्धापन दिन सोहळ्यासाठी जेष्ठ नागरिकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.