जेसीआय चाळीसगाव सिटीचा 26 वा पदग्रहण समारंभ

0

चाळीसगाव । जेसीआय चाळीसगाव सिटीचा 26 वा पदग्रहण सोहळा समारंभ नुकताच झाला असून नुतन अध्यक्ष म्हणून जेसी. बालाप्रसाद राणा यांना मावळते आयपीपी जेसी गजानन मोरे यांनी त्यांचा पदभार सोपविला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेसी गजानन मोरे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. प्रकाश बाविस्कर सर, झोन 13 चे अध्यक्ष जेसी अ‍ॅड महेंद्र चांडक, उपाध्यक्ष जेसी विवेक डोबा, मा. अध्यक्ष जेसी प्रितेश कटारीया व सचिव जेसी धर्मराज खैरनार उपस्थित होते. प्रथमत: दिपप्रज्वलन व जेसीस प्रार्थना करण्यात आली. प्रमुख अतिथींच्या स्वागत व सत्कार समारंभ करण्यात आला.

नवनिर्वाचीत कार्यकारणीचा शपथविधी
नुतन अध्यक्ष जेसी बालाप्रसाद राणा सचिव अफसर खाटीक, आयपीपी निलेश निकम, उपाध्यक्ष जेसी मुराद पटेल आशुतोष खैरनार, प्रा. विजय शिरसाठ, हरेश जैन, डॉ. प्रसन्न अहीरे, अ‍ॅड शैलेंद्र पाटील, सह सचिव योगेश तलरेजा, कोषाध्यक्ष योगेश पाटील, सह कोषाध्यक्ष प्रा. सुवालाल सुर्यवंशी, अमोल सोनवणे, अ‍ॅड सागर पाटील, दिनेश चव्हाण, अजय जोशी, सागर चौधरी, संग्रामसिंग शिंदे, जेसी रेट विंग अध्यक्ष दिपाली राणा, ज्यु.जेसी विंग अध्यक्ष प्रितम चौधरी, जनसंपर्वै अधिकारी धर्मराज खैरनार या कार्यकारणीचा शपथविधी करण्यात आला.

यांनी पाहिले कामकाज
त्यांनी विद्यार्थ्यांकरीता आय स्मार्ट हा सर्टीफीकेट कोर्स असून त्यात नवीन प्रणाली विकसीत करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जेसी संजय पवार व आभार अफसर खाटीक यांनी मानले. या कार्यक्रमासाठी निलेश गुप्ता, सचिन पवार, देवेन पाटील, राजेंद्र छाजेड, प्रा. चंद्रकांत ठोंबरे, सुरेश तलरेजा, व सर्व सदस्यांनी सहकार्य केले. प्रमुख अतिथी प्रा. प्रकाश बाविस्कर यांनी जेसीभाव चाळीसगाव सिटीच्या कार्याचा गौरव करत विद्यापीठासारखी एक प्रशिक्षण संस्था असून यात अनेक तरूण प्रशिक्षक घेत जिवन जगण्याचे धडे शिकतात.