जे ई स्कूल आणि ज्यु.कॉलेज च्या मुलींनी सैनिकांना पाठवल्या राख्या.

मुक्ताईनगर प्रतिनिधी ….

येथील जे ई स्कूल आणि ज्यु कॉलेज च्या विद्यार्थी नी “धागा प्रेमाचा….राखी अभिमानाची” या उपक्रमअंतर्गत NCC 18 महाराष्ट्र बटालियन येथील सैनिकी विभागातील सर्व पदाधिकारी तथा सैनिक बंधूंना एम आर चौधरी व व्ही एम लोंढे यांचे मार्फत राख्या व पोस्टाचे पत्र पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या.विद्यालयातील उपक्रम शिल शिक्षक एस आर ठाकूर यांच्या संकल्पनेतून गेल्या 8 वर्षा पासून हा उपक्रम राबविला जात आहे.सदरील उपक्रम स्वतः पत्र व राख्या आणून स्वखर्चातून ते राबवतात.विद्यार्थ्याना पत्र लेखन हा भाग प्रत्यक्ष कृती द्वारे शिकवणे आणि देश रक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण करून वेळ प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सैनिक बंधूंना संदेश पाठवणे हा उद्देश डोळ्या समोर ठेवून सदर उपक्रम हे शिक्षक राबवितात.जवळ जवळ 100 विद्यार्थिनी यात सहभागी होऊ त्यांनी आपल्या भावना मराठी,हिंदी, व इंग्रजी या भाषांमधून व्यक्त केल्या.

विद्यार्थ्याना आजच्या या धकाधकीच्या व आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात कालबाह्य होत चाललेल्या गोष्टी ची ओळख व्हावी आणि प्रत्यक्ष पत्रा द्वारे आपल्या भवभावना व्यक्त कशा कराव्यात या साठी मदत होते.तसेच देश रक्षणासाठी आपल्या परीवारापासून लांब राहून देश सेवा करणाऱ्या आपल्या सैनिक भावांचे हात राखी विना राहू नये हा उद्देश सफल होण्यास मदत होईल.यासाठी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अगदी मना पासून यात सहभागी होतात.

सदर उपक्रमा साठी प्राचार्य आर पी पाटील,उपप्राचार्य जे पाटील,पर्यवेक्षक एस आर महाजन, व्हीं डी बऱ्हाटे, एस पी राठोड, व्ही बी राणे , व्हि डी पाटील, एस एस कोळी, व्ही एम चौधरी, सी डी पाटील, एस एम वाढे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर बंधू भगिनी उपस्थित होते.