जे ई स्कूल विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनी शालेय कामकाज सांभाळून घेतला अनुभव.

मुक्ताईनगर प्रतिनिधी…..

आज ५ सप्टेंबर शिक्षक दिन जे ई स्कूल आणि ज्यु कॉलेज मध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला.

गुरुर्ब्रह्मा,.. गुरुर्विष्णु…

गुरुदेवो… महेश्वर..

गुरु साक्षात परब्रम्ह…

तस्मै श्री गुरुवे नमः…

या उक्ती प्रमाणे आपल्या भारतीय संस्कृती शिक्षकाला महत्वाचे स्थान आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी अध्यात्मिक गुरुच्या प्रति आपला भाव आपण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 5 सप्टेंबर 1962 पासून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा व्हावा अशी भावना त्यांनी व्यक्त केली आणि तेव्हापासून या दिनाला सुरुवात झाली.

शिक्षक दिन विद्यालयात मोठ्या आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या दिवशी मुलं प्रत्यक्ष शिक्षक बनून शालेय कामकाज तथा प्रशासन चालवून स्वानुभव घेतात. जणू आपल्या गुरुजनांप्रती आपला आदरभाव अशा उपक्रमात सहभागी होऊन व्यक्त करतात. विद्यालयातील सकाळ व दुपार सत्रात हा कार्यक्रम साजरा होत असतो. जवळजवळ शंभरहून अधिक विद्यार्थी शिक्षकाची भूमिका बजावतात. या दिवशी इयत्ता नववी व दहावी तथा सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष तासिका घेऊन वर्ग कार्याचा अनुभव घेतला. विद्यालयामार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाच्या विकासाच्या दृष्टीने असे शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. पहिल्या चार तासिका विद्यार्थी शिक्षक घेतात त्यानंतर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांना अभिवादन व शिक्षक दिन कार्यक्रम घेतला जातो. सदर कार्यक्रम सुरुवातीपासून तर समारोपापर्यंत मुलंच हाताळतात. इयत्ता दहावीतील सर्वाधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्राचार्य उपप्राचार्य तथा पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी सोपवली जाते. जी अत्यंत चोखपणे विद्यार्थी पार पडतात. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी शिक्षक तथा विद्यार्थ्यांनी आपल्याला आलेला अनुभव अनुभव शब्दातून व्यक्त केला. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवनपट उलगडून दाखवला. “जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे…..!!! याप्रमाणे शिक्षकांबद्दल भावना व्यक्त केल्या.

शिक्षक दिनानिमित्त संस्थेच्या चेअरमन रोहिणी खडसे खेवलकर , उपाध्यक्ष नारायण चौधरी, सचिव डॉक्टर सी एस चौधरी व सर्व संचालक यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. प्रसंगी प्राचार्य आर पी पाटील,उपप्राचार्य जे जे पाटील, पर्यवेक्षक एस आर महाजन, व्हि डि बऱ्हाटे,एस पी राठोड उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे नियोजन एस आर ठाकूर , व्ही डी पाटील , एस बी वंजारी , आर पी पाटील , सी डी पाटील यांनी केले.सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनींनी सहकार्य केले आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.