जळगाव शहरामध्ये मागील काही आठवड्यांत जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त किशोरराजे निंबाळकर यांनी सफाई व अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम धडाक्यात राबवली. संपूर्ण शहराची सफाई काही दिवसांमध्येच पूर्ण करण्यात आली असल्याने जळगाव शहर चकाकत आहे. किशोरराजे यांनी जळगावकरांच्या मनात घर केले. अनेक वर्षांपासूनची न झालेली गोलाणी मार्केटची सफाई, अजिंठा चौफुलीतील अतिक्रमण काढून रूंद केलेला रस्ता, रेल्वेस्थानकाजवळील भिंत पाडल्यामुळे दूर झालेली वाहतुकीची कोंडी आदी गोष्टी किशोरराजेंनी धडाक्यात आणि झटक्यात मार्गी लावल्या. किशोर राजे आपल्या प्रत्येक कामामध्ये सक्रिय असून ते स्वतः स्वच्छता करतानाही दिसत आहेत. नुकत्याच एका बैठकीत त्यांनी पिकविमाचे अर्ज भरताना जिल्ह्यातील अधिकार्यांनी जर हलगर्जीपणा किंवा दिरंगाई केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा दिला होता. एकंदरीत अतिक्रमण, स्वच्छता मोहीम वा इतर कामे असो किशोरराजे अधिकार्यांना धारेवर धरताना दिसत आहेत.
’नायक’ या हिंदी चित्रपटातील अनिल कपूरने एका दिवसाचा मुख्यमंत्री बनल्यावर ज्याप्रकारे कामाचा धडाका सुरू केला होता, अगदी त्याचप्रमाणे सध्या जळगावात किशोरराजे कामे करीत आहेत. मागील महिन्यात लोकशाहीदिनी कार्यालयात आपली गार्हाणे घेऊन आलेल्या तक्रारदारांच्या जागी जाऊन किशोरराजेंनी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या. या कृतीमुळे त्यांच्यामधील माणुसकीचे दर्शनही झाले होते. यामुळेच ते सध्या जळगावकरांचे असली ’नायक’ ठरले आहेत.जळगावकरांमध्ये त्यांच्याबद्दल कामाचा विश्वास निर्माण झाला आहे. यामुळेच जळगावला पूर्णवेळ आयुक्त नियुक्त न करता महापालिकेचा प्रभारी कारभार त्यांच्याकडेच राहू देण्याचा सूरही जळगावकरांमध्ये सध्या उमटत आहेत. काही राजकीय पक्षांनी किशोरराजेंकडेच महापालिकेचा प्रभारी कारभार राहू देण्यासाठी महापालिकेसमोर निदर्शने केली आहेत, तर काही संघटनांनी स्वाक्षरी मोहीम राबवून किशोरराजेंकडेच कारभार राहू देण्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात ’सोनु…तु या माझ्यावर भरवसा नाय का?’ हे गाणे सुपरहिट ठरत असून नुकतेच जयंत पाटील यांनी विधानसभेत या गाण्याच्या माध्यमातून भाजप व सेनेच्या सत्तेची गमतीदार पद्धतीने मांडणी केली. काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये रेडिओ एफएमच्या आरजे मलिष्काने याच गाण्यावर बीएमसीची पोलखोल केली होती. या गाण्यामुळे सेना व मलिष्कामध्ये चांगलेच वादंग निर्माण झाले होते. याच धर्तीवर जळगावमध्ये किशोरराजेंच्या यशस्वी कामगिरीबाबतीत माझ्या काही ओळी…
राजे…तुमच्यावर जळगावचा भरवसा हाय की!
जळगावकर झाले होते त्रस्त…त्रस्त…
आधीचे अधिकारी
कसे व्यस्त…व्यस्त…
मात्र तुमचे आगमन झाले
जबरदस्त…जबरदस्त…
राजे..तुमच्यावर जळगावचा
भरवसा हाय की..हाय की…!
येताच तुम्ही कसे केले
जळगाव स्वच्छ…स्वच्छ…
शहरातील अतिक्रमण झाले
जमीनदोस्त…जमीनदोस्त…
तुम्ही घेतले अफाट कष्ट…कष्ट…
त्यामुळेच जळगावच्या समस्या
कशा होताय नष्ट…नष्ट…
राजे…तुमच्यावर जळगावचा
भरवसा हाय की…हाय की…!
तुमच्या या धडाका मोहिमेमुळे जळगाव
शहर कसे दिसू लागले मस्त…मस्त…
जळगावकरांच्या आशा आता
तुमच्यावरच जास्त…जास्त…
राजे…तुमच्यावर जळगावचा
भरवसा हाय की…हाय की…!
स्वप्निल सोनवणे – 7507728977