मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःच म्हणत आहेत की माझ्या जीवाला धोका आहे. मी सत्तर वर्षातले घोटाळे बाहेर काढतो आहे, माझे काहीतरी बरे वाईट करतील अशी भीती ते व्यक्त करतात. हे एक बोलणे झाले, त्यानंतर लगेच दुसऱ्या भाषणात मोदी म्हणतात की तुम्ही सुरक्षित हातांमध्ये देश दिला आहे. दोन भाषणांमध्ये यांची भाषा कशी बदलते? जे स्वतःच सुरक्षित नाहीत ते देश काय सुरक्षित ठेवणार? असा प्रश्न राज ठाकरेंनी केला आहे. ट्वीटरवरून त्यांनी प्रश्न केला आहे.