अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील जैतपीर येथे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्याहस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले.
आमदार शरीषदादा चौधरी यांच्या प्रयत्नांनी जैतपिर येथे मंजूर झालेली अत्याधुनिक ग्रामपंचायत इमारत (१० लाख) व व्यायामशाळा इमारत (७ लाख) आदी कामे पूर्णत्वास आल्याने या वास्तुंचे लोकार्पण तसेच माळण नदी व झाडी नाला येथे दोन साठवण बंधारे (३२ लाख) या कामाचा भूमिपूजन सोहळा जैतपिर येथे आ.चौधरी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. याप्रसंगी आमदार शिरीष चौधरी यांनी भविष्यात याच प्रकारे विविधांगी विकास करणार असल्याची ग्वाही दिली.