जळगाव । जैैन इरिगेशनची उपकंपनी असलेल्या जैन फार्म फ्रेश फुड्स या कंपनीने जागतिक दर्जाच्या बेल्जियम येथील इनोव्हाफुड् या कंपनीचे शंभर टक्के भाग भांडवल खरेदी करून अधिग्रहण केले. इनोव्हाफुडच्या अधिग्रहणामुळे युरोपीयन बाजारपेठांसह आशियन देशांमध्ये जैन फार्म फ्रेश फुड्सच्या उत्पादनांची शृंखला पोहचणार आहे. यामूळे गुणवत्तापूर्ण कांदा, लसूण निर्जलीकरण केलेल्या भाज्या आणि नुकताच सुरू झालेल्या मसाला व्यवसायाचा विस्तार वाढला आहे. जैन फार्म फ्रेश फुड्स लिमिटेड फळ आणि भाजीपाला प्रक्रीया करणारी कंपनी आहे. दरम्यान इंग्लंडमधील जैन फार्म फ्रेशचा अन्न घटक व्यवसाय आणि नवीन अधिग्रहण केलेली कंपनी इनोव्हाफुड एन. व्ही. या दोघांच्या पुरवठा साखळी आणि वितरणाचे जाळे यांची व्यवस्थीत मांडणी करून किंमत सानुकूल करता येईल. व्यवस्थापन गट तसाच कायम राहील. जैन फार्म फ्रेश फूड्सची मागील पंधरा वर्षापासून बेल्जियम, द नेदरलँडस आणि लक्सेंबर्ग (बेनेलक्स) आणि फ्रान्स येथील बाजारपेठांत इनोव्हाफूड ही निवडक वितरक आहे.
निर्जलीकरण प्रक्रिया
आंब्याच्या प्रक्रीयेमध्ये जागतिक किर्ती मिळविलेल्या जैन फार्म फ्रेशमध्ये कांदा, लसूण निर्जलीकरण प्रक्रिया होते. या कंपनीची उत्पादन शृंखला विस्तीर्ण असून त्यात सेप्टीक, निर्जलीकृत, आयुक्यूएफ, शीतकरण करून आर्द्रता कमी केलेल्या भाज्या व विविध मसाले यांची निरनिराळ्या क्षेत्रात उत्पादत करते.
मसाले व्रिक्री
इनोव्हाफूडने निर्जलीकरण (डिहायड्रेशन) केलेल्या भाज्या, औषधी (वनस्पती), मसाले आणि मसाल्यांचे अर्क, शीतकरण केलेले सुकलेले पदार्थ, नैसर्गिक अन्नाचे रंग, जैव-उत्पादने आदी. महत्त्वाच्या अन्नघटकांची शृंखलाच जैन फार्म फेशने उपलब्ध केली आहे.
जैन फार्म फ्रेशने बेल्जियमच्या इनोव्हाफूडचे केलेले अधिग्रहण ही विस्तारीत होत असलेल्या जैन उद्योग समूहाच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. जगभरात अधिकाधिक विस्तारण्यासाठी तसेच नवीन ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी या अधिग्रहणाचा मोठा उपयोग होणार आहे. इनोव्हाफूड आणखी विस्तारीत व मोठी होणार यात काही शंका नाही,
– अशोक जैन,
अध्यक्ष, जैन इरिगेशन
संलग्न व्यवसाय
या अधिग्रहणामूळे जैन फार्म फ्रेश फूड्स बाजापेठांच्या आणि ग्राहकांच्या अधिक जवळ पोहचते. तसेच विस्तार वाढीत असलेल्या अन्न घटकांच्या बाजारपेठेमध्ये थेट प्रवेश करित आहे. यामूळे पुरवठा साखळी सानुकूल होवून अन्न उत्पादनांच्या किंमती कार्यक्षम होतात. आणि मूल्यवृध्दी संधी मिळणार आहे. या व्यवहाराच्या पूर्ततेसाठी कोणत्याही सरकारी नियामकांच्या मंजूरीची आवश्यकता नसेल.