जैन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राखली यशाची परंपरा कायम

0

जामनेर/अमळनेर । तालुक्यातील पळासखेडे बुद्रुक येथील जैन इंटरनॅशनल स्कूलच्या विदयार्थ्यानी मार्च 2017 मध्ये सीबीएसई बोर्ड मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहवीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवित आपली परपंरा कायम राखली आहे. सदर परीक्षेसाठी शाळेतील एकूण 30 विद्यार्थ्यी बसले होते. त्यापैकी तीन विद्यार्थ्याना सीजीपीए पॅटर्ननुसार 10.0 गुण मिळाले असून शेवटच्या विदयार्थ्याने 7.2 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

परीक्षेत यश मिळविणारे विद्यार्थी याप्रमाणे
रितीक संजय राजपूत, अश्विनी परमेश्वर राजपूत, साक्षी किशोर अग्रवाल या तीन विद्यार्थ्याना (10.0), तर वेदांत रमेश पाटील व जान्हवी संजय शहापूरकर यांना (9.8), कोमल रमेशकुमार जैन (9.6), मोनाली मनोज कावडीया, रिया जितेंद्र खंडेलवाल, या तिघांना (9.4) टक्के गुण मिळाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष राजकुमार कावडीया सचिव मनोजकुमार कावडीया यांच्यासह सर्व सदस्य प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदिनी अभिनंदन केले आहे.

अ‍ॅड.ललिता पाटील स्कूलचे सीबीएसई परीक्षेत यश
अमळनेर । सीबीएसई बोर्ड दिल्ली यांचा ऑनलाइन निकाल आज घोषित झालेला असून अमळनेर येथील अ‍ॅड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता दहावीविच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यात यशस्वी विद्यार्थ्यांमधे रोशनी प्रकाश लधानी (95.2 टक्के), अंकिता हरीश शामनानी (93.4 टक्के), तेजस्विनी नरेंद्र सोनावणे (86.4 टक्के), रोशनी नरेंद्र पंजवानी (86.6 टक्के), कांचन दीपक खियानी (86.4 टक्के) एवढे गुण मिळवून शाळेचे नावलौकिक केलेले आहे. अमळनेर मधील पहिली सीबीएसई माध्यमच्या शाळेतुन पहिल्यांदाच इयत्ता दहावीसाठी विद्यार्थ्यानी प्रवेश घेतला होता. यामुळे शालेय व्यवस्थापन विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष ठेवून होते. याचीच पावती म्हणुन म्हणुन विद्यार्थ्यानी चांगल्या गुणानी उत्तीर्ण होऊन शालेय शिक्षणाची गुणवत्ता सिद्ध केली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड. ललिता पाटिल, सचिव प्रा. शाम पाटिल, संचालक पराग पाटील, प्राचार्य श्रुतिरंजन बारीक सर, देवश्री पाटील, प्रशासन अधिकारी अमोल माळी यांच्यासह सर्व शिक्षक वृंदानी अभिनंदन केले.

विविध उपक्रम राबविल्याने यश
सीबीएसई शाळेत गेल्या वर्षभर दहावीच्या विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रमातून राबवित असल्याने आज विद्यार्थ्यांचे सार्थक झाल्याच दिसून आले आहे अशी माहिती पालकांनी पत्रकारांची बोलतांना सांगितले.