जळगाव। 14 एप्रिल हा दिवस भारत सरकारच्या आदेशान्वये आग सेवा दिवस म्हणून पाळला जातो. याच अनुषंगाने जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडच्या जैन हिल्स, जैन व्हॅली, जैन प्लॅस्टिक पार्कसह विविध आस्थापनात अग्निशमन सेवा दिवस साजरा केला. याबरोबरच दरवर्षांप्रमाणेच या वर्षीदेखील 14 ते 20 एप्रिल दरम्यान ‘सुरक्षा सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले आहे.
‘आपले जीवन व संपत्ती वाचविणारा खरा सोबती – फायरमन’ या संकल्पनेवर आधारित हा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. शुक्रवारी 14 पासून या सप्ताहाला सुरुवात करण्यात आले आहे. अग्नीशमन विभागातील आग विझवणार्या साहित्य व अग्नीशमन वाहनाचे पूजन वरिष्ठ अधिकारी सुनिल देशपांडे यांनी केले. तसेच मुंबई डॉकयार्ड व इतर आगीच्या अपघातांमध्ये मरण पावलेल्या अग्निसुरक्षा रक्षकांना श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी कंपनीचे वरिष्ठ सहकारी एस.डी. गुप्ता, व्ही.पी. पाटील, डी.जे.शितोळे, संजय पारख आदी उपस्थित होते.