जैन इरिगेशनमध्ये धूम्रपान व मद्यपानाचा केला निषेध साजरा

0

जळगाव । जैन इरिगेशनमध्ये 31 मे हा जागतिक धूम्रपान व मद्यपान निषेध दिन साजरा करण्यात आला. जैन प्लास्टिक पार्क, जैन फूड पार्क येथील सहकार्‍यांनी मद्यपान, धूम्रपान न करण्याची शपथ घेतली. धूम्रपान मद्यपान केल्यामुळे होणारे नुकसान व व्यसनांपासून दूर कसे व्हावे याबाबत उपस्थितांना तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. जैन इरिगेशन व चेतना व्यसनमुक्ती केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास जैन इरिगेशनचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. नितीन विसपुते यांनी मार्गदर्शन केले.

मान्यवरांकडून उपस्थितांना मार्गदर्शन
तंबाखूत असलेले निकोटीन शरीराला किती हानिकारक असते याबाबत डॉ. विसपुते यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सिगारेटमध्ये सुद्धा निकोटीन असतेच. तुमच्या हे लक्षात आले असेलच की तंबाखू किंवा सिगारेटच्या वेष्टनावरच एक धोक्याचा इशारा दिलेला असतो. तरीही अनेक जण व्यसन करतात दुर्दैव असे की, किशोरवयीन मुलामुलींमध्ये वाईट संगतीमुळे हे व्यसन आढळू लागले आहे. डॉ. विसपुते यांनी त्यांच्या दारुचा पहिला घोट या लेखामध्ये दारु शरीरासाठी किती हानीकीरक आहे हे सांगितले. व्यसन सोडणे ही कठीण गोष्ट नाही मात्र त्यासाठी पक्का निर्धार आवश्यक असावा असतो, याबाबत माहिती देण्यात आली.

स्वस्थविषयी दिल्या टिप्स
1965 साली हूने डबल्यूएचओने स्पष्ट केले आहे की, कुठलीही गोष्ट (पदार्थ) जास्त खाणे व पिणे हे एक व्यसन असते. डॉ. विसपुते यांनी व्यसन मुक्तीसाठी काही व्यायाम करणे सूचविले. डॉ.विसपुते यांनी भाषणातून 138 चा फॉर्म्युला दिला. दररोज 1 तास व्यायाम, 3 वेळा जेवण आणि 8 तास व्यवस्थित झोप घ्यावी म्हणजे व्यसनांपासून परावृत्त होता येईल. जैन इरिगेशनच्या प्लॅस्टिक पार्कमधील सुरक्षा अधिकारी श्री इमॅन्युअल यांच्या हस्ते चेतना व्यसन मुक्ती केंद्र प्रमुख डॉ. नितिन विसपूते यांचा सत्कार केला. मानव संसाधन विभागाचे ज्येष्ठ व्यवस्थापक पी एस नाईक यांनी प्रास्ताविक केले.