जैन इरिगेशनमध्ये वृक्षपूजा, वृक्षारोपण

0

जळगाव । जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने जैन इरिगेशन सिस्टिम्स् मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कंपनीचे सहकारी एस. व्ही. पाटील आणि मान्यवरांच्याहस्ते वटवृक्षाचे पूजन करून प्रतिकात्म वृक्षारोपण करण्यात आले. बांभोरी येथे देखील कंपनीच्या वरीष्ठ सहकार्‍यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. फक्त वृक्षारोपणच नव्हे तर ते वृक्ष जगवायची हमी देण्याचा संकल्प केला.

पर्यावरण संवर्धनाची शपथ
पर्यावरण संवर्धनासाठी, जास्तीतजास्त वृक्षांची लागवड आणि संगोपन करीन. माझे मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांनाही वृक्ष लावण्यासाठी आणि जगविण्यासाठी प्रवृत्त करीन. वृक्ष अभियानाचा माझ्या परिसरातही प्रचार करेन.स्वतः नव्या, अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांचा वापर करून इतरांनाही तसे करण्यासाठी सक्रिय प्रोत्साहन देईल

यांनी केले रोपांचे पूजन
यावेळी एस.व्ही. पाटील, ए.ओ. मुंगड, जी.आर. चौधरी यांनी वृक्ष पूजन केले तसेच संजय पारख, जी.आर. पाटील, जन्मेजय नेमाडे, राजेश घोरपडे, एस.आर. बांगर, एन.ए. जोशी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन पर्यावरण, आरोग्य व सुरक्षा विभागाकडून डि.जे. शितोळे यांनी केले होते. कंपनीतील अधिकारी व सहकार्‍यांची उपस्थिती होती.