आनंद खेडा येथील पीयूष चतुरमुथा या दीक्षार्थिचा केला सत्कार
शंभरहून अधिक परिवारने नोंदविला सहभाग
शिंदखेडा – धुळे जैन बिर्डिंगच्या माजी विद्यार्थ्यांचा परिवार सहित तीसरे स्नेहमिलन धुळे येथील जैन बोर्डिंगमध्ये नुकताच पार पडला. यात शंभरहून अधिक परिवारने सहभाग नोंदविला होता. सन2010मध्ये शिरपुरच्या संतोष ओसवाल यांनी व्हॅटस्ॲप गृप तयार करुन सर्वांना गेट टुगेदर शिरपुर येथे व 2016 मध्ये बालाजी लॉन्स, धुळे येथे व तीसरे धुळे येथील जैन बोर्डिंगमध्ये झाले. या एक दिवसीय स्नेहमिलनाच्या पहिल्या सत्रात आनंद खेडा येथील 20 वर्षीय पीयूष चतुरमुथा या दीक्षार्थिचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दीक्षार्थीचे आजोबा प्रकाशचंद चतुरमुथा, वडील प्रदीप चतुरमुथा, आई साधना तसेच या जैन बिर्डिंगचे माजी व्यवस्थापक व पहिले विद्यार्थी दुधेडीया हाईस्कुलचे माजी मुख्याध्यापक छबीलदास छाजेड, अध्यक्ष राजेंद्र कटारिया, सचिव पवन कोटेचा, सदस्य नेमीचंद तातेड, विजय दुगड, सुनील खिवंसरा, किशोर छाजेड, मनोज बंब, रिखबचंद सुराणा, मनीष संघवी, प्रशांत जैन, माजी व्यवस्थापक प्रकाशचंद लुंकड, अनिल बंब मंचवर उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी प्रा. चंद्रकांत डागा, पारस संकलेचा, सुषमा बेदमुथा, विजय दुगड यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विनोद कोचर यांनी केले. कार्यक्रमाच्या दरम्यान जैन बोर्डिंग वाट्स ग्रुपचे एडमिन संतोष ओसवाल या स्नेह मिलनासाठी परिश्रम घेणारे सुनील सिसोदिया, महेंद्र कांकरिया, उमेश चतुरमुथा, विनोद कोचर, विजय बिनायक्या सहित जे माजी विद्यार्थी विवध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. कॉन्ट्रेक्टर अनिल टाटिया(मुंबई), सीए पारस बोरा(मुंबई), सीए रिखब छोरिया, सीए(नाशिक) बिपिन चोरडिया(धुळे), अरविंद बोथरा(खापर), पप्पू बोथरा(खापर), राजेंद्र डागा (अक्कलकुवा) मुंबई हायकोर्टचे वकील महेंद्र कोचर, बीजेएसचे खानदेश विभाग सचिव प्रा. चंद्रकांत डागा(शिंदखेडा), औरंगाबादचे डॉ. योगेश सांडेचा यांचा सत्कार जैन बोर्डिंग धुळेच्या कार्यकारिणीने केला.
दरम्यान धुळे बोर्डिंगचे पहिले विद्यार्थी व गृहपति छबिलाल छाजेड यांनी सांगितले, माजी विद्यार्थी ही माझी सम्पत्ती आहे. धुळे जैन बोर्डिंग मुळेच मी प्रगती करू शकलो. जैन बोर्डिंगचे सचिव पवन कोटेचा यांनी, धुळे जैन बोर्डिंग मध्ये आपल्या गावातील शिकण्यासाठी विद्यार्थी पाठविन्याचे व बोर्डिंग च्या विकासासाठी आर्थिक मदतीसाठी आवहान केले. माजी विद्यार्थी परिवाराकडून धुळे जैन बोर्डिंग ला अकरा हजार रुपयाची रोख मदत देण्यात आली. स्नेह मिलनच्या दुपारच्या सत्रात उपस्थित माजी विद्यार्थ्यानी जुन्या आठवाणींना उजाळा दिला. नामपुरच्या सरपंचा रंजना बेदमुथा, शिरपुरचे डॉ. संजय सुराणा, डॉ.सतीष सुराणा यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान जैनम छोरिया, सुषमा बेदमुथा यांनी आपली प्रस्तुति प्रस्तुत केली. शिरपुर चे एंकर नवनित चोरडिया यांनी करमणुक केली. या स्नेह मिलानात धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, मुंबई, वापी, पूना आदि जिल्ह्यातील माजी विद्यार्थी आले होते.
-फोटो आहे