जैन समाजाकडून ‘महावीर की रोटी’ उपक्रम

0

चिंचवड – राष्ट्रसंत प. पु. श्री चंद्रप्रभजी म. सा. एवं राष्ट्रसंत श्री ललितप्रभाजी म. सा. यांच्या प्रेरणेतून चिंचवडमधील जैन बांधवांच्यावतीने येथील चापेकर चौक येथे ‘महावीर की रोटी’ हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी अन्नदानाचे वाटप चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रभाकर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामध्ये पिंपरी-चिंचवडमधील जैन समाजाने योगदान दिले. उपक्रमाचे नियोजन मनीष सोनगिरा, हेमंत गुगले, राजेंद्र जैन, दिलीप नहार, सचिन धोका, प्रसन्ना चोपडा, प्रवीण सोनिगरा आदींनी केले.