वरणगाव:- जैन भवनाची केवळ निर्मिती करून उपयोग नाही तर समाजाच्या प्रत्येक घटकाने सेवा दिली पाहिजे, जैन समाजाची एकजूट होणे काळाची गरज असल्याचे स्पष्ट मत येथे माजी मंत्री सुरेश जैन यांनी व्यक्त केले. शहरातील जैन समाजाचे भव्य अशा सामाईक स्वाध्याय देवकी भवनाचे लोकार्पण जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुरेश जैन होते. याप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख अतिथी रतनलाल सी.बाफना, दलूभाऊ जैन, कस्तुरचंद बाफना, माजी आमदार मनीष जैन, प्रेमचंद कोटेचा, नगरध्यक्ष सुनील काळे, राजीव पारीख, देवीचंद चोरडीया, हिराशेठ शिंदी, रफीक ठेकेदार, सहकार मित्र चंद्रकांत बढे, पंकज देवरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन देडिया तर आभार गणेश जैन यांनी मानले. दीपकचंद रुणवाल, अशोक साकरीया, संजय देडिया, नितीन लोढा, प्रमोदकुमार देडिया, हुकूमचंद खिवसरा आदींनी परीश्रम घेतले.