जैन समाजाच्या आगावूपणाला फ़टका

0

मुंबई : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून जैन सणांच्या कालखंडात मांसविक्रीला बंदीचा विषय गाजत होता. त्यातून अनेक वाद उफाळून आलेले होते. भाजपाचे सरकार आले, म्हणून जैन सणसुदीला मांसविक्री व मांसाहाराला प्रतिबंध घालण्यत आल्याचा गवगवा झालेला होता. पण प्रत्यक्षात काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर असताना हा प्रतिबंध लागू करण्यात आला होता. आता कायकोर्टाच्या खंडपीठाने दिलेल्या निकालामुळे तो उठला आहे.

हायकोर्टाच्या दोन भिन्न खंडपीठासमोर दोन वेगळ्या याचिका सुनावणीला आलेल्या होत्या. त्यापैकी एक पर्युषण काळात मांसविक्री व पशूहत्येला प्रतिबंध घालण्याचा विषय होता. दुसरी याचिका 2003 सालातील महावीर जयंतीच्या दिवशी असलेल्या प्रतिबंधावर होती. ह्या दुसर्‍या सुनावणीत न्यायालयाने प्रतिबंधाचा आदेश अवैध ठरवला आहे. तो आदेश महाराष्ट्र सरकारने राज्यातील नगरपालिका व महापालिकांसाठी लागू केला होता. महावीर जयंतीच्या दिवशी मांसविक्रीला त्यातून बंदी घातलेली होती. तो आदेश रद्द झाल्याने आता दुसर्‍या याचिकेवरही परिणाम होणार आहे.

पर्युषण काळ हा जैनांचा अतिशय पवित्र मानला जातो. तेव्हाही पशूहत्या व मांसविक्रीला बंदी घातली गेली होती, हा निर्णय अलीकडला होता. त्याच्याही विरोधात मटन दुकानदार हायकोर्टात गेले होते. त्याची सुनावणी चालू असताना, सरकारी वकिलांनी महावीर जयंतीविषयक बंदी उठल्याचे कोर्टाच्या नजरेस आणून दिले. देशभर संध्या मटन वा मांसविक्रेत्यांच्या विषय वादग्रस्त झाला असताना, महाराष्ट्रात मात्र अशा विक्रेत्यांना दिलासा मिळालेला आहे. वास्तविक जैन समाजातल्या उतावळ्या लोकांनी मध्यंतरी त्याच बाबतीत आगावूपणा करून, सार्वत्रिक बंदीसाठी पुढाकार घेतल्याने हे विषय वादाचे झाले. अन्यथा चौदा वर्षे ही बंदी बिनतक्रार चालू राहिली होती. पण भाजपा जिंकल्याने ़फुशारलेल्या काही जैन नेत्यांनी, आगाऊपणे त्या बंदीचा सार्वत्रिक अंमल करण्याचया नादात बंदी उठवण्यास हातभार लावला आहे.