जैन स्पोर्ट्समुळे जळगावचे नाव आघाडीवर

0

जळगाव । जैन स्पोर्ट् अकॅडमीमुळे राज्यात, राष्ट्रात नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात जळगावचे नाव अजरामर होत आहे. खेळाडूंना एक चांगले व्यासपीठ जैन अकॅडमीने उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे आज जगदीश झोपे सारखा ग्रामीण विभागातील खेळाडू भारतीय पातळीवर क्रिकेटमध्ये प्रतिनिधीत्व करीत असल्याचे गौखोदगार जळगावचे तहसिलदार तथाा कार्यकारी दंडाधिकारी अमोल निकम यांनी काढले. कांताई सभागृहात एका छोटेखानी कार्यक्रमात खेळाडूंचे सत्कार करतांना निकम बोलत होते.

तहसिलदार अमोल निकम यांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील तर व्यासपीठावर फारुक शेख, अविनाश आवारे, सुयश बुरकुल व प्रशासकीय अरविंद देशपांडे हे होते. सर्वप्रथम ज्या चारही खेळाडू व ऑफीशियल चे सत्कार होते. त्या सर्वांचा फेब्रुवारीचा कामगिरीचा आढावा फारुक शेख यांनी सादर केला. अशाप्रकारे चारही जैन स्पोर्ट्स चे खेळाडू असल्याने त्यांना क्रीडा साहित्य व बुके देऊन प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन फारुक शेख तर आभार सुयश बुरकुल यांनी मानले. या कायक्रमास प्रा.डॉ. अनिता कोल्हे, श्‍वेता कोळी, सैय्यद मोहसीन, अजित घारगे, रविंद्र धर्माधिकारी, प्रविण ठाकरे, एस.टी. खैरनार, मुश्ताक अली, गणेश लोहार, नरेंद्र चव्हाण, योगेश ढोंगळे खेळाडूंची उपस्थिती होती.