जॉईंट तुटल्याने ‘बीआरटी’त बस बंद

0
आठवड्यातील दुसरी घटना
पिंपरी-चिंचवड : बसच्या इंजिनमधील जॉईंट तुटल्याने बीआरटी बस बीआरटी मार्गात बंद पडली. ही घटना गुरुवारी दुपारी पाचच्या सुमारास एच ए कॉलनी स्टॉपवर घडली. बीआरटी बस बंद पडल्याची एका आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.  हडपसरवरून निगडी भक्ती-शक्तीकडे जाणारी बीआरटी बस (एम एच 14 / सी डब्ल्यू 1869) पिंपरीमधील एच ए कॉलनी बस स्टॉपवर आली असता, इंजिनमधील तांत्रिक दोषामुळे (जॉईंट तुटला) बंद पडली. दरम्यान बसमधून सुमारे 40 प्रवासी प्रवास करत होते. चालक व वाहक दोघांनी मिळून प्रवाशांना अन्य बसमध्ये बसवून प्रवाशांच्या गंतव्यस्थळी पोहोचविण्याची व्यवस्था केली.
ढिसाळ नियोजन
एका आठवड्यातील ही दुसरी घटना असल्याने बीआरटीच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एच ए कॉलनी बस स्टॉपवर बंद पडलेल्या बसच्या मागे कोणतेही वाहन नसल्याने याचा अन्य वाहनांवर कोणताही परिणाम झाला नाही. चालक व वाहकांनी हडपसर आणि निगडी पीएमपीएमएल बस डेपोला घटनेची खबर दिली आहे.