‘जोडे मारो’ आंदोलनातून पाकिस्तानचा निषेध

0

पुणे । ‘भारत माता की जय… इन्कलाब जिंदाबाद… पाकिस्तानचा धिक्कार असो,’ अशा घोषणा देत काळ्या फिती लावून कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल जोडे मारो आंदोलन वंदेमातरम् संघटनेतर्फे करण्यात आले. तसेच प्रतिकात्मक पुतळयाला जोड्याचा हार घालून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी संघटनेचे पुणे शहर उपाध्यक्ष आकाश गजमल, पुणे शहर सरचिटणीस अमन अलकुंटे, पुणे शहर सरचिटणीस किरण राऊत यांनी या आंदोलनाचे संयोजन केले होते. यावेळी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष वैभव वाघ, प्रदेश कार्याध्यक्ष सचिन जामगे, प्रशांत नरवडे, संतोष देवकर, महेश बाटले, अमेय सोनवणे, अमोल जगताप, सत्यजीत वायाळ उपस्थित होते.

वैभव वाघ म्हणाले की, पाकिस्तान सरकारने कुलभूषण जाधव यांच्या आईला आणि पत्नीला त्यांच्या चपला काढायला लावल्या, मंगळसूत्र, टिकली काढायला लावली. भेटीसाठी बोलावून अशा पद्घतीने अपमानास्पद वागणूक पाकिस्तानने दिली आहे.