जोरदार शक्तीप्रदर्शन करत गिरीश बापट, कांचन कुल यांचा अर्ज दखल

0

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून भाजपकडून पालकमंत्री गिरीश बापट व बारामती मतदारसंघातून कांचन कुल यांनी उमेदवारी अर्ज आज मंगळवारी दखल केले. जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आहे. कसबा गणपतीचे दर्शन घेऊन भाजपासह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बापट व कुल यांच्या समर्थनार्थ भव्य मिरवणुक काढत जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे, आमदार मेधा कुलकर्णी, विजय काळे, भीमराव तापकीर, आदी नेते उपस्थित होते. आगामी लोकसभेत पुण्यात गिरीश बापट यांची काँग्रेसचे मोहन जोशी तर बारामती मतदार संघातून कांचन कुल यांची राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्याशी लढत होत आहे.